मुक्ताईनगर । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची कुर्हा येथील अग्रण्य शाखा विविध समस्यांनी ग्रस्त असुन ग्राहकांना फुकट मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कुर्हा शाखा ही खुप जुनी शाखा असुन आजुबाजूच्या परीसरातील एकुण 22 गावे यास जोडली आहे. बॅकेच्या एकुण खातेदारांची संख्याही मोठी असुन साडे नऊ हजार ग्राहक या शाखेशी जोडलेले आहेत. तसेच हायस्कुल जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, विविध सोसायट्यांचे व्यवहार, अवकाळी पाऊस, नैसगिक आपत्तीची नुकसान भरपाईसुध्दा शेतकर्यांना याच शाखेतुन मिळते.
समस्यांकडे अधिकार्यांंचे होतेय दुर्लक्ष
एवढा मोठा कारभार असताना सुध्दा बॅकेचे व्यवहार सुरळीत असतात. मात्र जेव्हा वीज पुरवठा खंडीत होतो तेव्हा सर्वच कामे ठप्प पडतात शाखेत आहे ते कारण इन्व्हर्टर बॅटरी फक्त नावाला उरले आहे. त्यामुळे ग्राहक वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे तासनतास कर्मचारी व ग्राहक दोन्हीही त्रस्त असतात. आधी या शाखेत ऑनलाईन कामकाज चालत होते आता ऑनलाईन कामकाज सुरु झाले म्हणून कामात सुसुत्रता व वेग येईल अशी आशा सर्वांना होती झाले मात्र उलटे पुर्वी विज पुरवठा खंडीत झाल्यावर कामकाजावर काही परीणाम होत नसे आता मात्र विज बंद म्हणजे बॅक बंद अशी अवस्था निर्माण झाली आहे. ग्राहकांना दवाखान्याच्या तसेच शेतीच्या कामासाठी पैशाची गरज भासते आधीच नोटबंदिने ग्राहक त्रासलेले आहेत त्याच्यामध्ये कामकाज बंद झाल्यास त्यांचे महत्वाचे काम लवकर होत नाही. त्यामूळे ग्राहकांमध्ये कमालीचा संताप असुन हा गोधळ लवकरात लवकर दुर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे याबाबत बॅकेचे अधिकारी वारंवार वरीष्ठांकडे ही बाब मांडली असुन वरीष्ठांनी ताक्ताळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परीसरातील नागरीक करत आहे.