जिल्हा बँक 4 दिवसात शासनाला देणार अहवाल?

0

जळगाव। राज्य शासनाच्या वतीने उत्तरप्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखिल कर्जमाफी देण्यासाठी पुढे पाऊल टाकल्याचे सांगण्यात आले. असून यासाठी जिल्हा बँकेकडून 1 लाखा पर्यत कर्ज असणार्‍या कर्जबाजारी शेतकर्‍याच्या अहवालाची माहिती मागविण्यात आली आहे. यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती बँकिंग सूत्रांनी दिली आहे. मात्र 1 लाखाच्या आत नसल्याने इतर शेतकर्‍यांना सरकारने दिलेल्या संधी ला मुकावे लागणार आहे. जळगाव जिल्हा बँकेकडून माहिती अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

बँकेकडे पात्र शेतकरीच नाही?
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सरकारने मागविलेल्या अहवालाप्रमाणे पात्र शेतकरीच नसल्याने नेमकी माहिती पाठवायची कोणाची याबाबत संभ्रम निर्माण झालं आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बागायतदार असून शेतकरी अनेक दिवसा पासून अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. मात्र सरकारने शेवट पर्यत दुष्काळ जाहीर न करिता आर्थिक पॅकेज देण्याचे जाहीर केले होते. शेतकर्‍यांनी बँकेच्या सोसायट्या मधून परिस्थिती अभावी शेती करण्यासाठी कर्ज घेतले होते.

विरोधकांचा दबाव?
उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीनंतर महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारवरही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांन पासून ते शेतकर्‍यान पर्यत मोठा दबाव वाढत आहे. यामुळेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील 1 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांची यादी मागवली आहे. या संदर्भात ईमेल च्या स्वरूपात जिल्हा बँकांना अहवाल पाठविण्यात यावा.