नंदुरबार: गुजरात राज्यातीत वाळू वाहतूक जिल्हा हद्दीतील रस्त्याच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हयांतंर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गानी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतांनाही सारंगखेडा येथील नाकेबंदीवर रात्री तीन वाळू वाहतूक करणााऱ्या वाहनांना महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहेत . यावरून जिल्हाबंदी असतांनाही वाळू वाहतूक सुरूच असल्याचे निदर्शनांस आले आहे .
गुजरात राज्यातील तापी नदीमधून वाळू उपसा केला जातो . त्याचा लिलाव केला जातो . महाराष्ट्र व गुजरात सिमावर्ती वाळूचे लिलाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील धुळे , मुंबई , औरंगाबाद , नाशिक , जालना आदी भागात वाळू वाहतूक केली जाते . महाराष्ट्रातीलच वाळू व्यापारी पावसाळ्यात चढ्या भावाने वाळू विक्री करण्यासाठी वाळूची साठवणूक करतात . ही वाळू कोरोना संक्रमित भागात होत असल्याने तसेच जिल्हयात या वाळू मुळे एक रुपयांचाही महसूल मिळत नसतांनाही जिल्हयातील रस्त्यांची दुर्दशा होत आहे . अपघात होत आहेत . त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे .
गुजरात राज्यातुन शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू वाहतूक नंदूरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गी न जाता . ती जिल्हा सिमा व जिल्ह्यांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी , असे आदेश जिल्हाधिकारी डॉ . भारूड यांनी दिले आहेत . मात्र रात्री ,बेरात्री गुजरात हून जिल्ह्यांत प्रवेश करून महाराष्ट्रांत वाळू वाहतूक होत आहे सारंगखेडा येथे तापी नदीच्या पुलाजवळ नाकाबंदीच्या ठिकाणी रात्री उशिरा पर्यत तीन वाहनांना मंडळधिकारी जुबेर पठाण यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आले आहे . तलाठी संजय मालपुरे , तलाठी सोमनाथ जाधव व भुपेंद्र राजपूत , संजय कोळी यांनी पकडले आहेत . तिंघी वाहनांना सारंगखेडा पोलीस ठाण्याजवळ लावल्या आहेत .
तीन वाहनांवर दंडात्मक कारवाई .
गेल्या आठवड्यात ही गुजरात मधील वाळू जिल्हात बंदी असतांनाही वाळू वाहतूक केल्या प्रकरणी मंडळ अधिकारी जूबेर पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . या वाहन धारकांकडे बंदी पूर्वीची रायट्री पावती असल्याने न्यायालयाने प्रत्येक वाहन चालकांना बाराशे रुपये दंडांची कारवाई केली आहे .
……..