जिल्हा मध्यवर्ती बँकेची 11.16 टक्के वसुली

0

जळगाव । जिल्हा मध्यावर्ती सहकारी बँकेची वसुली मार्च अखेर संपण्यावर आला असतांना 28 मार्च पर्यंत 11.16 टक्के झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील बोदवड 1.90 टक्के,धरणगाव 3.93 टक्के,जामनेर 55.31 टक्के सर्वात कमी वसुली झाली आहे.प्रथमच जिल्हा बँकेची सर्वात कमी वसुली झाली आहे.

कर्जमध्ये नोटांबदीचा फटका बसला आहे.कर्जमाफी होणार आहे यामुळे शेतकर्‍यांनी कर्ज भरले नाही आहे.त्यांना आशा होती की कर्जमाफी होणार त्यामुळे ही वसुली कमी झाली आहे. जिल्हा बँकेची सर्वात कमी झाली आहे.त्यामध्ये अमळनेर 20.27 टक्के,भडगाव 9.04 टक्के,भुसावळ 26.41टक्के, बोदवड1.90टक्के, चाळीसगाव 6.96टक्के, चोपडा 24.60टक्के, धरणगाव 3.93 टक्के, मुक्ताईनगर 6.58टक्के, एरंडोल12टक्के, जामनेर 5.31टक्के, पाचोरा14.17टक्के , पारोळा10.43टक्के, रावेर 9.22टक्के, यावल24.19टक्के,जळगाव 13.94 एकुण 11.16 टक्के वसुली झाली आहे.