जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमचा शुभारंभ

0

धुळे। येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नागरिकांसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली असुन या सेवचा अधिकृत शुभारंभ काल बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे हे अध्यक्षेतेखाली जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी,संचालक सुरेश पाटील, प्रभाकर चव्हाण यांच्यासह संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यालया असलेल्या गरूड बाग शाखेतील जागेत हे एटीएम सुरू करण्यात आले असुन याठिकाणी रूपी डेबीटकार्ड आणि रूपी केसीसी कार्ड वापरता येणार असल्याची माहिती बँक कर्मचार्‍यांनी दिली. त्या अनुशंगाने शेतकर्‍यांना यावेळी रूपी डेबीट कार्ड व रूपी केसीसी काडेचे वितरणही करण्यात
आले.