नंदुरबार । विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांना पेन्शन योजना, पत्रकारांसाठी संरक्षण कायदा अंमलात आणावा,आदी विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार संघाच्यावतीने राज्यात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जीवन पाटील,सचिव नरेंद्र बागले,सदस्य रवींद्र चव्हाण, विशाल माळी, रणजित राजपूत, यांच्यासह निलेश पवार,अविनाश सोनवणे, भिकेश पाटील,बाबा राजपूत, गौतम बैसाने,बंटी ज्ञानेश्वर माळी, जगदीश सोनवणे,वसंत सोनार, आदी सर्वच माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकारांना संरक्षणाची मागणी करण्यात आली.