अध्यक्षपदी राजकुमारी बालदी यांची एकमताने निवड
जळगाव – जळगाव जिल्हा महिला असोसिएशन पदग्रहण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी समाजसेविका वासंती दिघे यांच्या उपस्थितीत पत्रकार भवनात उत्साहात पार पडला. सभेत माजी अध्यक्षा राजकमलताई पाटील यांनी नूतन अध्यक्षा राजकुमारी बालदी यांच्याकडे पदभार सोपवले.
वासंती दिघे यांनी महिलांच्या समस्यांवर काम करण्याची , महिला जागृतीकरणावर प्रबोधन करण्याची प्रकर्षाने गरज आहे, समाजात नीती मूल्यांची होणारी घसरण पाहता, ताण तणाव वाढीस लागले असून मतभेदाचे वातावरण तयार होतेय, या पार्श्वभूमीवर जागृतता केली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, यासाठी आवाहन केले. महिला दिनी सांस्कृतिक कार्यक्रम सोबत समाजकारण, महिला प्रबोधन होईल, असे कार्यकम महिला मंडळानी आयोजित करावे, असे हि सांगितले. माजी अध्यक्ष राजकमल पाटील यांनी हि असोसिएशनच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
नूतन कार्यकारिणी जाहिर
अध्यक्षपदी राजकुमारी बालदी, उपाध्यक्ष मंगला नगरकर आणि भारती पाथरकर, सचिव-ज्योस्ना बऱ्हाटे, सह सचिव– सोनिया म्हस्के, कोषाध्यक्ष– मीनाक्षी वाणी, प्रचार प्रमुख -वैशाली पाटील, संघटक प्रमुख , उषा सरोदे, इतर कार्यकारी सदस्य– राजकमल पाटील, वासंती दिघे, छाया गडे, कमल पाटील, हेमलता रोकडे, देवानंदा साखला, पुष्पा साळवे, बिंदिया नांदेडकर, कार्यकर्ता फोरम– चंद्रकला परदेशी, मंगला सोनवणे, ज्योती पाटील, भावना टेकवानी, अंजली पाटील, शिरीन अमेरिलीवाला, योगिता सपकाळे, जिजा राठोड, सिद्दी नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील विविध महिला मंडळ अध्यक्ष, सचिव उपस्थित होत्या. सुत्रसंचलन वैशाली पाटील, आभार ज्योस्ना बर्हाटे यांनी केले.