जिल्हा राष्ट्रवादीचा उद्या मेळावा

0

जळगाव। राष्ट्रवादीच्या पक्षसंघटन बांधणीसाठी माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जिल्हा प्रभारी व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष आ. जयदेश गायकवाड, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता आर पाटील, ओ.बी.सी.चे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुथे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकर्ता मेळावा श्रीकृष्ण लॉन्स शिरसोली रोड येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.

उपस्थितीचे केले आवाहन
मेळाव्यानंतर सर्व फ्रंटलच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवक, युवती, विद्यार्थी, सेवादल, महिला यासह सर्व फ्रंटचे पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, जि.प.पं.स. सदस्य नगरसेवक, नगराध्यक्ष सहकार क्षेत्रातील पदाधिकारी विविध संस्थाचे पदाधिकारी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी केले आहे.