जळगाव- जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल एका महिलेच्या पतीने रुग्णालय आवारातीलच झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. देवलाल बारेला (26) असे मयताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
रविवारी रात्री त्याने गळफास घेतला, सोमवारी सकाळी रुग्णालय आवारात फिरणार्या इतर रुग्णाच्या नातेवाईकांना झाडावर लटकलेला मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ माहिती रुग्णालयातील डॉक्टरांना कळविली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले व रुग्णालयातील कर्मचार्यांच्या मदतीने मृतदेह झाडावरुन खाली उतरविला.
(सविस्तर वृत्त लवकरच)