जिल्हा रुग्णालयात ४ नव्याने कोरोना संशयित रुग्ण दाखल

0

आतापर्यंतचे तपासणी झालेले ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव- जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात शुक्रवारी ४ नवीन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून न आल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे

जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी नव्याने दाखल झालेले चारही जण हे मुंबई तसेच पुण्याहून गावी परतलेले आहेत . गावी परतल्यावर त्याला सर्दी ताप खोकला असे कोरोना सदृश लक्षणे जाणवल्याने ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत तिघांचे नमुने घेण्यात असुन ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

३४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयात आजपावेतो एकूण ३९ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. त्यापैकी २ जणांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले. तर ३४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले असून तिघांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .भास्कर खैरे यांनी दिली. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे