उपचार सुरु ; पतीशी कडाक्याच्या भांडणानंतर कृत्य
जळगाव- कौटुंबिक वादातून विवाहितेचा पतीसोबत वाद झाला, या वादातून विवाहितेने पर्समधील विषारी औषध प्राशन केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात आवारात घडला. महिला अत्यवस्थ असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवकॉलनीतील रहिवासी सुनंदा प्रमोद इंगळे ही महिला पतीसोबत शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात आवारात उभी होती. दोघांमध्ये काही तरी वाद होवून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून सुनंदा इंगळे हिने तत्काळ पती प्रमोद यांची नजर चुकवून पर्समध्ये सोबत असलेली विषारी औषधाची बाटली काढली व विषारी औषध प्राशन केले. तत्काळ तिला पतीसह प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.