जिल्हा रूग्णालयातून दुचाकी लंपास

0

जळगाव । शहरातील बी.जे. मार्केटमध्ये काम असल्याने जिल्हा रूग्णालयात दुचाकीची पार्किग करून कामानिमित्त गेले असता अज्ञात चोरट्यांनी जिल्हा रूग्णालयातून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिमराव रघूनाथ कोळी (वय-43) रा. जिजाऊ नगर, वाघ नगर हे काही कामानिमित्त बी.जे. मार्केटमध्ये जाण्यासाठी स्प्लेडर क्रमांक (एमएच 19 एडी 6536) ने जिल्हा रूग्णालयात सकाळी 11 वाजेच्या सुमारास आल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी पार्किंग करून बी.जे.मार्केटमध्ये निघून गेले. काम आटोपून 11.30 वाजेच्या सुमारास असल्यानंतर त्यांनी परत आल्यानंतर दुचाकी दिसली नाही. भिमराव रघूनाथ कोळी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.