जळगाव – जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शोभाबाई संतोष महाजन, चोपडा तालुकयातील पंचक येथील हिरालाल वसंत भिल व बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील सहिम सुलतान हे तिघ रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने सुमारे तीन तास रुग्णांना त्याठिकाणी ताटकळत बसावे लागले. दरम्यान काही वेळानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून परिचारीकांना रुग्णांची तपासणी करण्याची विनंती केली. मात्र परिचारीकांकडून तपासणीसाठी नकार देत रुग्णांच्या नातेवाईकांसोबत अरेरावी करण्यात आली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर अखेर तासभराच्या कालावधीनंतर वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात दाखल झाले व त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले.