जळगाव। जळगाव जिल्हावकील संघातर्फे न्यायालय आवारत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पदाधिकारी संदस्यांनी आवारातील घाण-कचरा एकत्रीत करुन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. जळगाव जिल्हा वकील संघाची नुकतीच नविन कार्यकारणी गठीत झाली आहे. नवनियुक्त सदस्य आणि पदाधिकार्यांनी विधायक कामाची सुरवात स्वच्छता अभियानाने आज पासुन केली. महिन्याचा द्वितीय आणि चौथ्या शनिवारी सुटीचे औचित्य साधून जिल्हा वकीलसंघा तर्फे जिल्हा न्यायालयाच्या अवारात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या ठिकाणी झाली साफसफाई
वकील संघाचे अध्यक्ष अॅड..राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात, उपाध्यक्ष अॅड. मिलींद बडगूजर, अॅड. अनील पाटील, अॅड. महेश ढाके, जेष्ठविधीज्ञ अॅड. प्रदिप सोपारकर, अॅॅड. शिरीन अमरेलीवाला, अॅॅड. रत्ना चौधरी, अॅड. रजनीश राणे यांच्यासह अॅड.श्रीकृष्ण निकम, अॅड. शरीफ शेख, अॅड प्रवीण शिंदे आदी वकील बांधवांनी न्यायालय आवारातील कॅन्टीनचा परिसर, संशयीत अरोपींच्या बसण्यासाठी बनवण्यात आलेल्या दोन्ही जागा, नवीन बिल्डींगचा परिसर, जुन्या बिल्डींग परिसरातील मातीचे ढिगारे, रानगवत काढण्यात आले,अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य व्यवस्थीत ठेवून साफसफाई करण्यात आली. अभियानासात महापालीका कर्मचारी अभिमन सपकाळे, दिपक अहीरे,राजू नाडे, भिकन पेंढारकर यांच्यासह वकीलंसघाचे कर्मचारी सुभाषचौधरी गोपाल भाई आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.