जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा संपन्न

0

पालघर (संतोष पाटील) – जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समिती सभा खासदार चिंतामण वनगा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. भारत सरकार यांचे आदेशानुसार केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती अधिक्रमित करून जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) स्थापन करण्यात आली. सभेत आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हा परिषद पालघर, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आदि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सभेत केंद्रपुरस्कृत योजनांचा सन 2016 -17 अखेर पर्यंतच्या कामांचा भौतिक व आर्थिक आढावा घेण्यात आला.

पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण ) हागणदारीमुक्त सध्यस्थितीचा अहवाल 2017-18 जून 2017 अखेर पालघर जिल्ह्यातील तलासरी, वसई,वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड हागणदारी मुक्त घोषित झाल्या बाबत माहित सादर केली व पालघर तालुक्यातील मधील 7 ग्रामपंचायत व डहाणू तालुक्यातील 4 ग्रामपंचायत 15 ऑगस्ट पर्यंत हंग्दारीमुक्त करण्यात येतील अशी माहिती समितीला दिली. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत 59 % टक्के कामे सन 2016-17 जून अखेर पूर्ण झाल्याबाबत माहिती दिली.