जिल्हा वैद्यकीय प्रशासन यंत्रणेची चालढकल

0

जळगाव: कोरोना बाधित रुग्णाची बहीण जामनेरला दिली आहे. धक्कादायक गोष्ट अशी की ती बहीण त्या कोरोना बाधिताजवळ तिच्या परिवारासह 14 दिवस राहिली आहे. ती शनिवारी, २८ रोजी एका डेलीसर्विसच्या 407 मध्ये रात्री जामनेरात आली होती. त्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जावेद मुल्लाजी, रमजान, लियाकतअली सय्यद या सर्वांनी प्रशासनाला कळवून लगेच ती महिला, तिचा पती, चार मुले व गाडीचा ड्राइवर, क्लिनर या सर्वांना जळगाव सिव्हिलमधे घेउन गेले असता त्यांना फक्त गोळ्या देऊन परत केले. वास्तविक या रुग्ण संपर्क झालेल्यांना विशेष निगराणीखाली ठेवून रक्त, थुंकी तपासायला हवी होती. पुणे येथे प्रयोगशाळेत ते पाठवणे आवश्यक होते .मात्र, जिल्हा वैद्यकीय प्रशासन यंत्रणा चालढकल करत उडवाउडवी करते आहे. डीन हे जामनेर वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर, कलेक्टर तहसीलदारवर अशी ढकलाढकल करीत आहेत. कर्तव्यदक्ष आ. गिरीष महाजन यांनी सांगितले तरी या जिल्हा वैद्यकीय यंत्रणेला काही फरक पडत नाही. विशेष म्हणजे ते 8 ही संपर्क नातेवाईक सर्वच टेस्ट करायला तयार आहेत. पण प्रशासन चालढकल करीत आहेत.

इतर सर्वच राजकारणी घरात बसून आहेत तर मग संवेदनशील जामनेरला वाली कोण? असा प्रश्न त्यानिमित्त उपस्थित झाला आहे. जळगावचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या संवेदनशील प्रकरणात लक्ष घालून कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईक आणि संपर्कात असलेल्या सर्वच जणांना क्वारन्टाईन करावे.तसे आदेश जिल्हा आरोग्य यंत्रणेला द्यावे आणि भयभीत झालेल्या जामनेरकर नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.