जिल्हा व सत्र न्यायालयातील विधी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मुदत वाढ

0

जळगाव- जिल्हा व सत्र न्यायालयाकरीता विधी अधिकार्‍यांची सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पदावर २ वर्षाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीला पुढील एका वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास २ वर्ष पूर्ण होतील तोपर्यंतच कालावधी, यापैकी जो अगोदर घडेल तोपर्यंतच्या कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात आली आहे.

यात ऍड.प्रदीप महाजन, ऍड.विजय खडसे, ऍड. प्रविण भोंबे, ऍड.पंढरीनाथ चौधरी, ऍड.निलेश चौधरी, ऍड, किशोर बागुल, ऍड. राजेंद्र चौधरी, ऍड. शशिकांत पाटील, ऍड. अनुराधा वाणी, ऍड. सुरेंद्र काबरा,ऍड. वैशाली महाजन, ऍड. संभाजी जाधव यांचा समावेश असून याबाबतचे आदेश राज्यपालाचे अवर सचिव संजीव केळुसकर यांनी काढले.