जिल्हा शल्य चिकित्सकांवरील गुन्हा मागे घ्या; नंदुरबारात कर्मचाऱ्यांचे कामबंद !

0

नंदुरबार। येथील जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्यावर रुग्णालयातीलच एका महिला कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. डॉ, भोये यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो मागे घ्यावा आणि त्या महिलेवर कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कामबंद आंदोलनामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.