जिल्हा सत्र न्यायाधिश लव्हेकर यांना निरोप

0

जळगाव। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.ए.लव्हेकर यांची जळगाव येथुन कोल्हापूर येथे बदली झाल्याने जिल्हा वकिल संघातर्फे निरोप समारंभ दि. 13 रोजी बार रुम क्र. 116 मध्ये जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण व्ही. वाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी वकिल संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. स्वाती निकम, सचिव अ‍ॅड. गोविंद तिवारी मंचावर उपस्थित होते. निरोप समारंभानिमित्त आलेल्या अनुभवांचे कथन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुशिल अत्रे यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.

जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.ए.लव्हेकर यांचा सत्कार जिल्हा वकिल संघातर्फे शाल, श्रीफळ व कुशल प्रशासक या शिर्षकाचा छायाचित्रांचा संग्रह प्रदान करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना न्या. लव्हेकर यांनी वि.दा.करंदीकर यांच्या ‘वय वर्षे 39’ या कवितेचा उल्लेख करुन वकिल संघाचे आभार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. एल.व्ही.वाणी यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. आभार अ‍ॅड.स्वाती निकम तर सुत्रसंचालन अ‍ॅड. गोविंद तिवारी यांनी केले.