जिल्हा स्वस्त धान्यग्राहक समस्या निवारण समिती जिल्हाध्यक्षपदी गणेश महाले

0

जळगाव: जिल्हा स्वस्त धान्यग्राहक समस्या निवारण समितीची बैठक सोमवारी पद्मालय येथे पार पडली.  यात समितीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश महाले यांची निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी मच्छिंद्र सोनवणे, जितेंद्र साळवे, खंडू महाले, फिरोज शेख, गणेश जोशी, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.