जळगाव – येथील 73 वर्षीय पुरूषाचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे. नेमका तो कुठला व त्याची हिस्ट्री काय हे मात्र कळु शकलेले नाही.
संबंधित वृद्ध अमळनेर शहरातील असून तो जिल्हा रुग्णालयात दाखल होता. तो यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही मात्र त्याबाबत यंत्रणेची चौकशी सुरू आहे .
अमळनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पोहचली चारवर
यापूर्वी अमळनेरातील तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता एकट्या अमळनेर तालुक्यात कोरोनाबाधीतांची असल्याची संख्या चारवर पोहचली आहे. अद्याप पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अहवाल येणे बाकी असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .