जळगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत. यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 86.13 टक्के इतका निकाल लागला आहे. नाशिक विभागात मात्र धुळे जिल्ह्याने 88.87 टक्के निकाल लागल्याने खान्देशात अव्वल आला आहे. त्यात नाशिक – 86.85 टक्के, धुळे- 88.87 टक्के, जळगाव – 84.20 टक्के आणि नंदुरबार जिल्ह्याचा -84.70 टक्के निकाल लागला आहे.
मु.जे.महाविद्यालय
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मू जे महाविद्यालय) जयेश राजेंद्र पाटील हा विद्यार्थी 92.92 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत महाविद्यालयातून सर्व प्रथम आलेला आहे. नेहा राजेश कलंत्री ही विद्यार्थीनी वाणिज्य शाखेत 96.15 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली आहेे़ तर कला शाखेतून सायली सुभाष करे ही विद्यार्थीनी 87.84 टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे़ तसेच शंकर भंग्गी राठोड हा विद्यार्थी 83.23 टक्के गुण मिळवुन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत सर्व प्रथम आलेला आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 94.92 टक्के ,विज्ञान शाखेचा िाकाल 98.22 टक्के ,वाणिज्य शाखेचा निकाल 94.47 , कला शाखेचा निकाल 70.33 उच्च माध्येमिक व्यवसायीक अभ्यासक्रमचा निकाल 67.44 टक्के इतका लागला. विज्ञान शाखेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ आहेत. वाणिज्य शाखेत 24 विद्यार्थांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण आहेत. विज्ञान शाखेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थांची संख्या 244 आहेत. वाणिज्य शाखेत विषेश प्राविण्य प्राप्त विद्यार्थांची संख्या 189 आहे. कला शाखेत 7 विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त आहे. विशेष खास बाब म्हणजे वाणिज्य शाखेची विद्यार्थींनी नेहा राजेश कलंत्री हीला अकॉऊंट व गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. अकॉऊंट विषयात स्वेता जैन, वरद पाटील, राम सोमाणी, ओम साहित्या, सरिता जाखड, नम्रता कासार, प्रेरणा कुमट यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेत चिमय ललवाणी, सिद्धी कासट, याांना गणित विषयात 100 गुण मिळाले तसेच विज्ञान शाखेत रुतुजा कोल्हे हिला इलेक्ट्रोाीक्स विषयात व दिपाली पाटील हिला संस्कृत विषयात 100 गुण मिळाले. विज्ञान शाखेत जयेश राजेंद्र पाटील ( 92.92) प्रथम, किरण प्रदिप घुमारे (92.77) व्दितीय तर श्रेया गिरीशकुमार पंडीत (92.61) तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत नेहा राजेश कलंत्री (96.15) प्रथम, तर व्दितीयस्थान सिध्देश आनंदा येवले व क्षितीजा राकेश न्याती यांना 94.31 टक्के गुण मिळाल्याने विभागून देण्यात आले आहे. तृतीयस्थानी निशांत देवेंद्र खंडेलवाल (94.15) आला आहे. कला शाखेत सायली सुभाष करे (87.84)प्रथम , आराध्या गौरव संतराज (86.31) व्दितीय, तर इश्वर मुकुंद वखरे व सैय्यद फरझाजअली फैय्याजअला (82) टक्के गुण यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला. उच्च शिक्षण व्यवसाय अभ्यासक्रमात प्रथम- शंकर भंग्गी राठोड (83.23) प्रथम, गणेश गोकूळ अटोरे (78.46) व्दितीय, सागर नारायण लोहार (75.38) तृतीय क्रमांक पटकविला. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक व अभिांदन के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक एस.ओ. भाळे, व उपप्राचार्या करुणा सपकाळे यांनी केले आहे़
जी.डी.बेंडाळे महाविद्यालय
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल 70.14 टक्के, वाणिज्य शाखेचा 94.50 टक्के व विज्ञान शाखेचा 91.15 टक्के निकाल लागला आहे. तसेच एचएससीव्हीसी विभागातील एम. एल. टी. शाखेचा 75 टक्के, इलेक्ट्रॉनिक्स 86.96, तर अकौंटन्सी अँड ऑडीटींग शाखेचा 95.45 टक्के एवढा निकाल लागला आहे. कला शाखेतून पायल अशोक महाजन ही विद्यार्थिंनी 82.76 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर प्रियंका नरेंद्र पाटील 81.33 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. वाणिज्य शाखेतून दिव्या किशोर काबरा ही 89.54 टक्के गुण मिळवून प्रथम तर विभावरी राजेंद्र मोरणकर ही 83.54 टक्के गुण मिळवून व्दितीय तसेच विज्ञान शाखेतून प्रगती अमोल सपके ही 80.15 टक्के गुण मिळवून प्रथम तर दिव्या दिलीप ढाके हीने 80 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकविला. महाविद्यालयाच्या एच.एस.सी.व्ही.सी. विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतून सेजल देवगिर गोसावी ही 78.92 टक्के गुण मिळवून एमएलटी शाखेतून पुजा प्रल्हाद पाटील ही 75.84 टक्के गुण मिळवून तर अकौंटन्सी अॅन्ड ओ. एम. शाखेतून भाग्यश्री दिलीप जोशी 79.54 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. यशस्वी विद्यार्थिंनींचे प्राचार्य डॉ. एस.एस. राणे, उपप्राचार्य सुनिता पाटील, समन्वयक एन.जी. बावस्कर, उपप्राचार्य बी. पी. सावखेडकर, प्रा. श्रीमती आर. एन. महाजन तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
इकरा शाहीन निकाल 98.17 टक्के
इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.17 टक्के लागला असुन 236 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले असुन त्या पैकी 229 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम- सबा फातेमा आरीफ खान-85.69, व्दितीय- खान समीर अमानऊल्लाह-85.38, तृतीय- काजी शीफा मोहसीनुद्यीन-84.31, उमेर इकबाल-84.15 आणि खान मुईज इरफान-81.23 यांचा समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अहमद करीम सालार, सचिव अलहाज अ.गफ्फार मलिक, चेअरमन डॉ.मो.ताहेर शेख, प्रा.शेख गुलाब इस्हाक व संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
उर्दू हायस्कूल
येथील अंजुमन तालिमुल मुस्लेमीन संचलीत हाजी नूर मोहम्मद चाचा ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट व सायन्सच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यात विज्ञान शाखेतून 334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 93.29 टक्के निकाल लागला आहे. यात मोेहम्मद काशिफ शेख जफर 79.23 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. शेख नईमोद्दीन जफरूल हसून (76.76) व्दितीय तर मो. कैफ इद्रिस खान (76.30) टक्के मिळवून तृतीय स्थानी आला. कला शाखेत 41 विद्यार्थी पास होवून निकाल 53.94 टक्के लागला आहे. शमीना बी शेख मुबारक पिंजारी ही विद्यार्थींनी 74.15 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. मिदहत सबा सैय्यद मसरूर अली (72.92) द्वितीय, तर कौसर बी शेख नियोजोद्दीन (71.38) तृतीय. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ग. गफ्फार मलिक, प्राचार्य शेख मुकीन अमीन, उप प्राचार्य शेख नईमोद्दीन, पर्यवेक्षक फारुक अमीर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
अॅड.एस.ए.बाहेती कॉलेज
येथील क्रीडा रसिक एज्युकेशन सोयायटीच्या अॅड. एस. ए. बाहेती कनिष्ठ महाविद्यालयाचा 12वीचा निकाल 80.22 टक्के लागला असून इ. 12वी विज्ञान शाखेचा निकाल 96.80 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 88.83 टक्के तर कला शाखेचा निकाल 40.59 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत कुणाल योगेश पाटील (79.23) प्रथम, संदेश श्रीनिवास कलंत्री (78.46) द्वितीय तर तृतीय स्थानी युगल शामकांत महाजन (75.53) उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल एकूण 88.83 टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांकाने संजना संजय जैन (87) टक्के, आदिश विनोद जैन (84), प्रेक्षा अशोक जैन (81.84) मिळवून तृतीय स्थान पटकविले. कला शाखेचा एकूण निकाल 40.59 लागला असून प्रथम क्रमाांकाने मो. अक्रम मो. अस्लम (77.85), दिव्या विलास पाटील (66.15) व्दितीय, अविनाश गोविंद पवार (63.85) मिवळवून तृतीय स्थानी आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. पी. देशमुख, उपाध्यक्ष उज्वला बाहेती, सचिव रोहन बाहेती, संस्थेचे संचालक श्यामभाऊ कोगटा, नितीन बरडे, प्राचार्य अनिल लोहार, उपप्राचार्य प्रा. आर. पी. सोनवणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंद केले.
नंदिनीबाई विद्यालय
नंदीनीबाई वामनराव मुलींचे महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा निकाल 88.41 टक्के लागलेला विद्यालयातून तीनही शाखेतून सायली वासुदेव शुक्ला ही प्रथम आली आहे. कला शाखेचा निकाल हा 66.41 टक्के, वाणिज्य शाखा 98.83 टक्के तर विज्ञान शाखेचा 100 टक्के लागला आहे. कला शाखेत प्रतिभा विनोद इंगळे (79.38) प्रथम, कांचन दत्तु सोनवणे (77.85) द्वितीय, निकीता ईश्वर कोळी (73.85) तृतीय तर वाणिज्य शाखेत सायली वासुदेव शुक्ला (85.23) प्रथम, योगेश्री दिपक पाटील(83.85) व्दितीय, गौरी सुभाष महाले (81.54) तृतीय तसेच विज्ञान शाखेत सय्यद अव्रिना गोहर अब्दुल (76.77) प्रथम, प्रतिक्षा गुलाब पाटील (75.69) व्दितीय, एैश्वर्या नितीन ब्रह्मेचा (69.28) तृतीय.
जळगाव (तालुकानिहाय निकाल)
अमळनेर – 93.08, भुसावळ-81.97, बोदवड-82.11, भडगाव – 83.86, चाळीसगाव-76.94, चोपडा-84.82, धरणगाव-87.76, एरंडोल-79.84, जळगाव- 77.19, जामनेर-91.71, मुक्ताईनगर-82.32, पारोळा-77.40, पाचोरा-85.65, रावेर-81.24, यावल-86.47 आणि जळगाव शहर-85.87 असा निकाल जाहिर झाला आहे.
नुतन मराठा महाविद्यालयात कला शाखेचा निकाल 53.65 टक्के लागला आहे. यात अनिशा सुकदेव दानवे 74.15 टक्के मिळवून प्रथम आली आहे. तर व्दितीय स्थानी कुणाल सुभाष पाटील व ममता संभाजी चौधरी यांनी 72.92 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे व्दितीय स्थान पटकविले आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 82.32 टक्के लागला असून भावेश अशोक जैन (78.61) प्रथम, योगशे संतोष सुरवाडे (78.46) व्दितीय आला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 94.95 टक्के लागला असून ऋत्विक राजेश देशमुख (88.61) प्रथम, नेहा गजानन सोनवणे (85) व्दितीय तर सृष्टी संजय पटेल (82.5) तृतीय क्रमांक पटकविला. व्यवसाय अभ्यासक्रमांत इटीमध्ये 75 टक्के निकाल लागला आहे. यात आकाश राजु महाजन (68.76) प्रथम, शुभम हरीचंद्र जाधव (68) द्वितीय, ए/सीचा निकाल 75 टक्के निकाल लागला आहे. यात सुरज भरत दानवाला (66) प्रथम, अमित विजय धोपे (64.46) व्दितीय तर एल/एस, एल/एमध्ये 64 टक्के निकाल लागला आहे. यात अक्षय रघुनाथ घोडसे (61.08) प्रथम तर दिनकर तुळशीराम बारी (60.15) टक्के द्वितीय स्थानी आला आहे.
नूतन मराठा महाविद्यालय
नुतन मराठाचा भावेश जैन हा वाणिज्र शाखेत 79 टक्के गुण मिळवून महाविद्यालरात पहिला आला. त्रालापेढा भरवून अभिनंदन करतांना आई सुरेखा जैन व काकू मंगला जैन
रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय
जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून प्रथम भक्ती कुलकर्णी 74.76, द्वितीय शुभम बोरोले 74.15, तृतीय मनिषा बारी 73.53 तर वाणिज्य शाखेतून प्रथम अभिषेख खेंडके 83.23, द्वितीय हितीक वालेचा 81.84, जान्हवी कुकरेजा व शुभम ताडे 76.30 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य प्रल्हाद खराटे, प्रा.दीपक पाटील, प्रा.विजय पाटील, अनिल सोनार, संतोष मिसाळ यांनी अभिनंदन केले आहे.