जळगाव। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. मागील वर्षाप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच आघाडी घेतली आहे. यशाची परंपरा कायम ठेवताना परीक्षेत मुली अव्वल ठरल्या आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल 87.62 टक्के लागला असून मुलींचा 91.72 टक्के तर मुलांचा 84.75 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचे पालक व नातलग यांच्या कडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण
जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा दीक्षा काळे तर वाणिज्य शाखेतून ऐश्वर्या पारपियानी प्रथम क्रमांक मिळविला आहे.आर.आर.मधून पाचपुते ऋत्विक हा विज्ञान शाखेतून 79.53 टक्के मिळवून प्रथम, का.उ.कोल्हे महाविद्यालय विज्ञान शाखेतुन मनिष पाटील 73.07 प्रथम, द्वितीय राठोड भाग्यश्री 71.84, कला शाखा बारी जागृती 77.84 प्रथम, बारी जयश्री 76.30 द्वितीय, डॉ.आण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय कला शाखा माळी कविता 81.38 प्रथम, माळी पुनम 76.30 द्वितीय, वाणिज्य शाखा अमृतकर नेहा 86.61 प्रथम, चौधरी दिपाली 85.53 द्वितीय, विज्ञान शाखा उज्मा नाज शेख इकबाल 78.15 प्रथम, उज्ज्वला गोरे 76.62 द्वितीय, इलेक्ट्रॉनिक शाखा मोहिनी नंदकिशोर 72.15 प्रथम, एम.एल.टी.शाखा सुजाता पाटील 77.00 टक्के, ऑडीटींग अॅण्ड अकौंटंसी शाखेतून सोनार हर्षाली 76.46 प्रथम, नुतन मराठा महाविद्यालय विज्ञान शाखा जान्हवी शिंदे 88 टक्के प्रथम, वाणिज्य शाखा म्हस्के स्वपना 80 प्रथम, कला शाखा यादव अर्जुन 76 प्रथम, अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय विज्ञान शाखा ज्योती जोशी 76.92 प्रथम, वाणिज्य शाखा नितीन जैन 90.46 प्रथम, कला शाखा चेतन माळी याला 64.85 प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
मुलींचा दबदबा कायम
बारावीच्या परीक्षेच्या टक्केवारी मध्ये मुलींनी सर्वाधिक गुण मिळवले असल्याने यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातून 49 हजार 179 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी पात्र होते. त्यापैकी 49 हजार 107 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण परिक्षार्थींपैकी 43 हजार 27 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. बारावी परिक्षेसाठी 28 हजार 938 मुले पात्र होते. त्यापैकी 28 हजार 896 मुलांनी परीक्षा दिली. त्यात 24 हजार 489 मुले उत्तीर्ण झाले. तर 20 हजार 241 मुलींपैकी 20 हजार 211 परीक्षा दिली. यामध्ये 18 हजार 538 मुली उत्तीर्ण झाल्याने एकदा पुन्हा शिक्षणात मुलीच अव्वल ठरल्याचे दिसून आले.
महाविद्यालयांचा निकाल टक्केवारीत
रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय 100 टक्के, आर.आर.कनिष्ठ महाविद्यालय 94.44, का.उ.कोल्हे महाविद्यालय 92.89, महाराणा प्रताप विद्यालय 75.15, कनिष्ठ महाविद्यालय मेहरुण 92.89, मिल्लत कनिष्ठ महाविद्यालय मेहरुण 56.25, इकरा कनिष्ठ महाविद्यालय मेहरुण 95.19,सेंट टेरेसा महाविद्यालय 100 टक्के, नूतन मराठा महाविद्यालय विज्ञान शाखा 94 टक्के, वाणिज्य शाखा 74, कला शाखा 54, डॉ.आण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला कला शाखा 72.69, वाणिज्य शाखा 91.16, विज्ञान शाखा 94.89, एम.एल.टी.शाखेचा 88, इलेक्ट्रॉनिक्स 80, अकौंटसं अॅण्ड ऑडीटींग शाखा 85.71, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय 84.64, अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय 75.44 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी बहुतांश महाविद्यालयांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. टक्केवारी वाढीसाठी महाविद्यालयांनी केलेल्या प्रयत्नात वाढीव तासिका, बाहेरील शिक्षकांद्वारे चाचणी, प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा आदींचा यात समावेश आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न केले आहे.
निकालासाठी स्मार्ट यंत्रणेचा वापर
आजच्या आधुनिक युगात चालण्यासाठी तरुणाई देखील स्मार्ट वर्क करताना दिसून आली. बर्याच विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी साईबर कॅफेत न जाता घरीच स्मार्ट मोबाईलचा वापर निकाल बघितला. मोबाईलवर वेब साईट सहज उपलब्ध झाल्याने बारावी बोर्डाचा निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुकता होती. अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. मोबाईलवरुन आपल्या नातलगांना परीक्षेत यश मिळाल्याची बातमी देतांना विद्यार्थ्याच्या चेहेर्यावर आनंद ओसांडून वाहत होता. आपल्या पाल्यांचा आनंदोत्सव व्दिगुणित करण्यासाठी मिठाईच्या दुकानावर देखील पालकवर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. 15 जूननंतर शाळा, महाविद्यालये सुरु होणार आहे. त्यानंतर गुणपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.
कहीं खुशी कहीं गम !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची तारीख 29 रोजी जाहीर करण्यात आली. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली होती. 30 रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. मात्र तत्पुती परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबतची भीती होती. परिक्षार्थी यांच्यासोबत पालकवर्गदेखील निकालाबाबत चिंताग्रस्त होते. पुढील शिक्षणासाठी गुण कमी मिळाल्यास शिक्षणास अडचण नको म्हणून प्रत्येक विद्यार्थी काळजी घेताना दिसून आले. जे विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले त्यांच्यात आनंद दिसून आला तर जे अनुत्तीर्ण झाले ते रडकुंडीस आले होते. मात्र अनुत्तीर्ण झालेल्यांना ऑक्टोंबरमध्ये पुन्हा संधी मिळणार आहे.