जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी संतोष जाधव

0

बारामती । भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त आघाडी पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी संतोष पोपट जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संतोष जाधव हे चळवळीतील कार्यकर्ते असून भटक्याविमुक्त्यांच्या हक्कासाठी सतत कार्यरत असतात. संतोष जाधव यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब विटकर, बारामती शहराध्यक्ष यशपाल दादा भोसले, जिल्हा सरचिटणीस नितीन मदने यांच्या हस्ते करण्यात आला.

बारामती तालुक्यात जिल्हास्तरीय भटक्या विमुक्तांचा मेळावा घेण्याचा मानस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मेळाव्यासाठी निमंत्रीत केले जाणार आहे, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.