* पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांचे आदेश
* आदेशाचे पालन न केल्यास होणार कारवाई
* जो अधिकारी कर्तव्यात कसुर करेल त्याचे वेतन वाढ रोखण्याचा दिला इशारा
जळगाव – जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे पुर्णपणे बंद करा असा आदेश पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी 15 ऑक्टोंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या आढावा बैठकीत दिले. आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही यावेळी त्यांनी अधिकार्यांना दिला. जिल्हातील सर्व पोलीस स्टेशनाच्या कामकाजाचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्त शिंदे यांनी त्यांचा दालनात घेताला. यावेळी जिल्हातील सर्व पोलीस स्टेशनचे पोनि विविध विभागाके अधीकारी उपस्थित होते. दरम्यान त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनाचा आढावा घेत दाखल गुन्हे, तपासची प्रगती आदी बाबत माहिती घेत अधिकार्यांना विविध सुचना केल्या. तसेच दाखल गुन्हे साबित होण्याच्या अत्यल्प प्रमाणावर नाराजी व्यक्त करत गुन्हे साबित करण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देत अधिकार्यांना धारेवर धरले.
वेतन वाढ खात्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय
जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असून त्या त्या ठिकणच्या पोलीस निरिक्षकांच्या उदासीनतेमुळे या अवैध धंद्यांना अभय मिळत अहे. आश्या अवैध धंद्याची माहिती मिळतच पोलीस अधीक्षक स्वत: त्या ठिकाणीकारवाई करत आहे. मात्र आता अवैध धंद्यांबाबत अधिकार्यांची उदसीनता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक श्री. शिंदे यांनी देत अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहे. तसेच जो अधिकारी कर्तव्यात कसुर करेल त्याचे वेतन वाढ रोखण्यासासह खात्यांतर्गत कारवाई करण्याच निर्णय घेतला असून एका पो.नि.चे 2 वर्षाचे वेतन वाढ रोखण्याची कारवाई देखील केली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
’सीसीटीएनएस’ प्रणाली कार्यान्वित
जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे संपुर्ण कामकाज हे पेपरलेस होत सर्वत्र ऑनलाईन प्रणाली ’सीसीटीएनएस’ राबविण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक दत्ता शिदे यांनी सर्व पोलिस निरीक्षक व इतर अधिकार्यांना सक्त ताकीद देत प्रत्येक पोलिस स्टेशच्या स्टेशन डायर्या त्यांनी यावेळी ताब्यात घेत या क्षणापासून नागरिकांची तक्रार, फिर्याद, गुन्ह्यच्या तपासाची माहितीसह विविध काम हे ’सीसीटीएनएस’ या ऑनलाईन प्रणाली मर्फतच करण्याचे आदेश बैठकीत दिले. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजात सुसुत्रता व पारदर्शकता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.