जिल्ह्यातील केबल जोडणी सर्वेक्षणाची सोडत

0

जळगाव । राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडण्यांचे विनाक्रम सर्वेक्षण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ग्रुप क्रमांक 1, 2 व 3 यामधुन माहे मे 2017 साठी प्रत्येकी एका केबल परिचालकांचे विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्यासाठी सोडत पद्धतीने निवड होणार आहे. ही सोडत शनिवार दि. 6 मे 2017 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड येथील नियोजन भवनात होणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील ग्रुप क्रमांक एक-1 ते 40, ग्रुप क्रमांक दोन-41 ते 100 व ग्रुप क्रमांक तीन-101 च्या पुढील सर्व जोडणी संख्या असलेल्या स्थानिक केबल परिचालक व एक बहुविध यंत्रणा परिचालक यांची निवड करण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्या केबल परिचालकांकडे वरीलप्रमाणे ग्रुप जोडणी संख्या असेल त्यांनी सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.