जळगाव:जिल्ह्यात बुधवारी नव्याने 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. एकूण रुग्णसंख्या 53 हजार 359 झाली आहे. तर 63 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 8, भुसावळ 2, अमळनेर 2, चोपडा 3, भडगाव 1, धरणगाव 1, यावल 2, रावेर 1, पारोळा 2, चाळीसगाव 8 याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.