कारवाईबाबत कमालीची गोपनीयता ; अहवाल गुलदस्त्यात
भुसावळ– जिल्ह्यात शंभर कोटी रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा झाल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केल्यानंतर पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जिल्ह्यातील 13 तालुक्यातील गोदामे तपासणीसाठी दक्षता समितीची नेमणूक केली होती. समितीने धान्याचे प्रमाणिकरण करीत सर्व दप्तर ताब्यात घेत गोपनीय अहवाल जिल्हाधिकार्यांकडे दिला होता तर पथकाने सर्व गोदामांना जाताना सील ठोकले होते. जिल्हाधिकार्यांनी सर्वच तालुक्यातील गोदामांचे सील उघडण्याचे आदेश दिले असून लाभार्थींना धान्य वाटपाबाबत सूचना केल्या आहेत.
अहवालाबाबत कमालीची गोपनीयता
भुसावळसह मुक्ताईनगर तसेच कुर्हा येथे सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने पथकाने काय अहवाल दिला? याबाबत उत्सुकता कायम आहे. सोमवारपासून जिल्हाभरात स्वस्त धान्य दुकानदारांना नियतनाचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.