जळगाव । कृषी, कृषी क्षेत्र संलग्नित, फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यकरणार्या शेतकर्यांचा राज्यसरकारतर्फे कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो. जिल्ह्यातील चार शेतकर्यांना कृषी सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. गुरुवावरी 29 रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी विश्वासराव पाटील यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदु महाजन यांचे बंधु प्रेमचंद महाजन यांना वसंतराव नाईक, यावल तालुक्यातील चिंचोली येथील रविंद्र मार्तंड पाटील यांना उद्यान पंडीत, यावल तालुक्यातील भालोद येथील नारायण शशिकांत चौधरी यांना कृषीभूषण सेंद्रीय शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.