जळगाव: राज्य शासनाने ग्रामविकास विभागातील गट-अ संवर्गातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत, तसा शासन निर्णय सोमवारी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेतील दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांची बदली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त (चौकशी) पदी झाली आहे. त्यांच्या जागी मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.आर.लोखंडे यांची नियुक्त झाली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस.अकलाडे यांच्या जागी के.बी.रणदिवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तीन गटविकास अधिकारी यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.बी.जोशी यांची खेड पंचायत समिती येथे बदली झाली आहे, तर जे.एन.आभाळे हे यावल, एस.डी.मावळे मुक्ताईनगर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त होणार आहे.