जळगाव- शासनाचा २०१७-१८ चा राज्य शिक्षक पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ३ शिक्षकांचा समावेश असून त्यांना बुधवार, ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाºया व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात येत असतो, यंदा देखील २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी राज्यासह जिल्ह्याभरातील उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांची यादी पाठविण्यात आली होती. अंतिम निवड यादी तयार करण्यासाठी जुलै महिन्यात समिती नियुक्ती केली होती.
मंगळवारी राज्यभरातील राज्य शिक्षक पुरस्काराच्या मानकरी असलेले शिक्षकांची यादी जाहिर झाली. यात जळगाव जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा पुरस्कार जाहिर झालेला आहे़ त्यात प्राथमिक शिक्षक विभागातून पारोळा तालुक्यातील धाबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मनवंतराव भिमराव साळुंखे यांना तर माध्यमिक शिक्षक विभागातून पारोळा तालुक्यातील पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई ज्युनीअर कॉलेज चे शिक्षक डॉ.ईश्वर शेखनाथ पाटील तर आदिवासी प्राथमिक शिक्षक विभागातून रावेर तालुक्यातील मोरवाल जिल्हा परिषद शाळेचे साहेबु मयबु तडवी यांचा समावेश आहे.