भुसावळ- प्रशासकीय सेवा पूर्ण झालेल्या 10 वनरक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवार, 28 रोजी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दि.वा.पगार यांनी काढले आहे. 31 मे पर्यंत संबंधित कर्मचार्यांच्या बदलीस्थळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. बदलीस्थळी रुजू न होणार्या कर्मचार्यांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तीन वर्षांपासून अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणार्या कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी व कंसात बदलीचे ठिकाण
भानखेडा वनरक्षक उमाकांत नवल कोळी (जुनोने, जामनेर वनक्षेत्र), मुक्ताईनगरचे दीपक गंगाराम रायसिंग (भुसावळ वनतपासणी नाका), वनोपज तपासणी नाक्याच्या सुप्रिया प्रभाकर देवरे (वडोदा पश्चिम, वडोदा वनक्षेत्र), जुनोनेच्या माया सुनील परदेशी (जुवार्डी पुर्व, चाळीसगाव वनक्षेत्र), दळवेलच्या वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (पारोळा वनक्षेत्र), रुईखेड्याचे चंद्रशेखर विलास पाटील (शिरसोली, जळगाव वनक्षेत्र), शिरसोलीचे प्रसाद सुरेश भारुडे (पिंप्रीपंचम, वडोदा वनक्षेत्र), पद्मालय दक्षिणचे प्रकाश रामभाऊ पाटील (मुक्ताईनगर वनक्षेत्र), पिंप्रीपंचमच्या उज्वला सुरेश पाटील (चाळीसगाव वनक्षेत्र), पारोळ्याच्या पूनम प्रल्हाद पाटील (दळवेल, पारोळा वनक्षेत्र) येथे बदली करण्यात आली.