भुसावळ- लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपविभागात सतत तीन वर्ष काम केलेल्या दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 21 पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी रविवार, 17 रोजी सायंकाळी काढले. दरम्यान, भुसावळ शहरातील तीन पोलिस ठाण्यातील चार उपनिरीक्षकांचाही बदल्या झालेल्या अधिकार्यांमध्ये समावेश आहे.
या सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांची चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तर चाळीसगाव ग्रामीणचे राजू रसेडे यांची नशिराबाद येथे बदली करण्यात आली आहे.
या उपनिरीक्षकांच्या बदल्या
बाजारपेठचे अनिस शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेत, बाजारपेठचे निशीकांत जोशी यांची जिल्हा विशेष शाखेत, भुसावळ तालुक्याचे दिलीप पाटील यांची जिल्हा विशेष शाखेत, भुसावळ शहरचे गणेश कोळी यांची भुसावळ विभाग वाचक, यावलचे उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांची बोदवड येथे, जिल्हापेठचे नाना सूर्यवंशी यांची भुसावळ शहर तसेच मेहुणबारेचे शेख मो.नाजीम यांची रावेर पोलिस ठाण्यात उपविभागात तीन वर्ष पूर्ण झाल्याने बदली करण्यात आली तसेच नेटीव्ह प्लेस असलेल्या 18 उपनिरीक्षकांच्याही बदल्या झाल्या असून त्यात बोदवडचे दिलीप चौधरी यांची मुक्ताईनगर उपविभाग वाचकपदी, निंभोर्याचे कैलास पाटील यांची जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत, पिंपळगाव हरेश्वरचे दिलीप पाटील यांची नियंत्रण कक्षात, मुक्ताईनगरचे कैलास भारसके यांची नियंत्रण कक्षात, रामानंदचे भागवत पाटील यांची नियंत्रण कक्षात, पारोळ्याचे सुधाकर लहारे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, रावेरचे मनोहर जाधव यांची जळगाव उपविभाग वाचक, शनीपेठचे सुरेश सपकाळे व खेमराव परदेशी यांची नियंत्रण शाखेत, फैजपूरचे जिजाबराव पाटील यांची नियंत्रण कक्षात, जळगाव तालुक्याचे बाळू पाटील यांची सायबर शाखेत, शनीपेठचे भीमराव शिंदे यांची सायबर शाखेत, जळगाव शहरचे सुभाष पाटील यांची नियंत्रण कक्षात, पाचोर्याचे सिद्धार्थ खरे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली.