जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान

0

पुणे । पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 28 शिक्षकांना यंदा जिल्हा शिक्षक पुरस्कार, तर 6 शिक्षकांना विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त 5 शिक्षक आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि ज्या शिक्षकांचे 5पेक्षा अधिक विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, अशा मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सोमवारी (दि.18) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे. अध्यक्ष विश्वास देवकाते, विवेक वळसे-पाटील, दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी शैलजा दराडे, उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे, संजय नायकडे आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही निवड केली आहे. या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण सभापती संगीता चौरे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत माने, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे आदींनी सदस्य म्हणून काम पाहिले.

विशष जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक
पुरंदर : विजय शिंदे (मांडकी प्राथमिक शाळा), तर बारामती : छाया गायकवाड (मुख्याध्यापक, शिवनगर केंद्रातील माळेगाव कॉलनी प्राथमिक शाळा).
हवेली : वैभव पोरे (पेरणे केंद्रातील वाघमारेवस्ती प्राथमिक शाळा) आणि दिपश्री वाणी (आर्वी प्राथमिक शाळा).

अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळा
1) पारगाव तर्फे खेड पहिली ते चौथी प्राथमिक शाळा (आंबेगाव तालुका), 2) मंडलीवस्ती पहिली ते चौथी प्राथमिक शाळा (इंदापूर तालुका), 3 खैरेनगर पहिली ते सातवी शाळा (शिरूर तालुका) आणि केंजळ पहिली ते सातवी शाळा (भोर तालुका).

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक
हवेली : अर्जना महेश दळवी (प्राथमिक शिक्षक, सांगरूण केंद्रातील बहुली प्राथमिक शाळा), पुरंदर : नंदकुमार पंढरीनाथ सागर (मुख्याध्यापकल जेजुरी जिजामाता हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज), पुणे : स्मिता श्रीधर करंदीकर (प्राथमिक शिक्षक, शनिवार पेठेतील अहिल्यादेवी होळकर मुलींची शाळा), हवेली : उज्ज्वला लक्ष्मण नांदखिले (प्राथमिक शिक्षक, साडेसतरानळी शाळा) आणि मुळशी : संजीव माधव बागुल (प्राथमिक शिक्षक, संभवे शाळा)

तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त शिक्षक
आंबेगाव : संजय रंभाजी कराळे (मोरडेवाडी केंद्रातील लोंढेमळा प्राथमिक शाळा), अरविंद बन्सी मोढवे (साकोरे केंद्रातील म्हाळुंगे पडवळ प्राथमिक शाळा) आणि अनिल खंडू गावडे (अवसरी खुर्द केंद्रातील वायाळमळा प्राथमिक शाळा)
हवेली : पूनम सचिन कडलक (काटेगाव नंबर 2 प्राथमिक शाळा), योगिता मराठे (गोजहे केंद्रातील सणसवाडी प्राथमिक शाळा) आणि बबन किसन सातव (केसनंद केंद्रातील तळेराणवाडी प्राथमिक शाळा)
बारामती : धनपाल नारायण माने (काटेवाडी प्रा. शाळा) जयश्री नानासाहेब लोणकर (शेंडकरवाडी प्रा. शाळा)
इंदापूर : शहराजी तात्या म्हेत्रे (काझड प्राथमिक शाळा) आणि राजेंद्र बबन पवार (सणसर प्राथमिक शाळा)
दौंड : सुरेशा नामदेव मेमाणे (यवत केंद्रातील माणकोबावडी प्राथमिक शाळा) आणि कविता ज्ञानेश्वर भापकर (खडकी केंद्रातील काळेवस्ती प्राथमिक शाळा नं. 1).
पुरंदर : संतोेष बोरकर (सुपे खुर्द केंद्रातील पानवडी प्राथमिक शाळा) आणि भारत वाघोले (वीर केंद्रातील तोंडल प्राथमिक शाळा).
मावळ : संगीता मनोहर शिरसाट (इंदोरी केंद्रातील माळवाडी प्राथमिक शाळा) आणि विष्णू पोपट गोडे (भोयरे केंद्रातील इंगळूण प्राथमिक शाळा).
मुळशी : हरिभाऊ नारायण वाघुलकर (मरकळ केंद्रातील हिंजवडी प्रा. शाळा).
भोर : नूतन विठ्ठल दानवले (बारे केंद्रातील बसरापूर प्राथमिक शाळा) आणि अशोक रघुनाथ मुजुमले (नसरापूर केंद्रातील केळवडे प्राथमिक शाळा).
वेल्हा : दीपक भगवान खवले (रांजणे प्राथमिक शाळा) आणि प्रमिला गुलाबराव जाधव (वाजेघर प्राथमिक शाळा).