जळगाव – महाराष्ट्रातील एकूण 58 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेला पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिक्षिक मच्छिंद्र रनमाळे व पोलीस मुख्यालयात कार्यरत सहाय्यक उपनिरिक्षक सुनील शामकांत पाटील या दोन जणांचा समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली असून 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात 58 जणांचा पदक जाहीर झाली आहेत.
यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिक्षिक मच्छिंद्र रनमाळे व पोलीस मुख्यालयात कार्यरत सहाय्यक उपनिरिक्षक सुनील शामकांत पाटील या दोघांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. या पदकाबद्दल अधिकारी कर्मचार्यांचे पोलीस उपअधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पोलीस कर्मचारी, अधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.