जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये संविधान प्रतीचे वाटप

0

जळगाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत संविधान सप्ताह राबविण्यात जात आहे. या सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, समतादुत प्रकल्प (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय कार्यालयाच्या सहाय्याने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

संविधाविषयी दिली माहिती
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील पंचायत समिती तसेच तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे तालुका समन्वयक, समतादुत यांच्याहस्ते संविधान प्रतीचे वाटप करण्यात आले. जळगाव येथील तालुका पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री पाईकराव यांनी केले. तर सुत्रसंचालन समातदुत मुकेश शिंदे यांनी केले. निंभोरा पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक शिला अडकमोल यांनी केली. तर सुत्रसंचालन हवालदार पाटील यांनी केले.

यांनी घेतले परिश्रम
याप्रमाणे जिल्ह्यातील पंचायत समिती व पोलीस स्टेशन येथे संविधान प्रतीचे वाटप करण्याचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील, कार्यालय अधिक्षक गणेश बोरसे, समतादुत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समतादुत, तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले.