जिल्ह्यातील वसतीगृहांमध्ये नव्याने प्रवेश प्रक्रिया होणार

0

जळगाव। शासनमान्य शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत डॉ. बाबासाहेब मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह जळगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर व अमळनेर तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह जळगाव, भुसावळ, रावेर, अमळनेर, चाळीसगाव येथे सन 2017-18 साठी प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या वसतीगृहांत प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, विजाभज, विमाप्र व इतर मागासवर्गीय तसेच अपंग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या संदर्भात समाज कल्याण संचालनालय, पुणे यांच्या 24 मे रोजीच्या आदेशान्वये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करुन प्रचलित अर्ज सादर करुन प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करावी.