BREAKING: जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद

0

जळगाव: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जळगाव जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ६ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी, कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली असून धार्मिक स्थळे केवळ पूजेसाठी खुली राहणार आहेत. सिनेमा गृहे, व्यायाम शाळा, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडे बाजार देखील बंद करण्यात आले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.