जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी पंप अनुदान मिळावे

0

जळगाव। जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनातर्फे कृषी पंप जोडणीसाठी अनुदान देण्यात येते. मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अनुदान थकले आहे. शेतकर्‍यांनी आवश्यक रक्कम भरुनसुध्दा शेतकरी कृषी पंप जोडणीपासून वंचित आहेत. 12 एप्रिल पर्यंत प्रलंबित अर्जाची संख्या 8 हजार 935 इतकी आहे. सर्वाधिक प्रलंबित अर्ज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदार संघात आहे. 2 हजार 435 अर्ज जामनेर तालुक्यातील शेतकर्‍यांची प्रलंबित आहे. त्याखालोखाल माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मतदार संघात 1 हजार 424 इतकी आहे.

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
दिवसेंदिवस कृषी पंपासाठी अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढत आहे. मात्र अनुदान मिळत नाही. शासनाने लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लागावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, किशोर पाटील, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पवार, जिल्हा उपाध्यक्ष किशोर लालसिंग पाटील, रोहन सोनवणे, ज्ञानेश्‍वर पाटील अमळनेर, विशाला काजळे बोदवड, संदीप पाटील शहराध्यक्ष एरंडोल, सलीम पटेल, आकाश भालेराव, निलेश निमसे, रोहन सोनवणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदी उपस्थित होते.