जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खाजगी क्लासेस, अभ्यासिका, ट्युशन्स, शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जारी केले आहेत. यात अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु, औषधालय वगळण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे आदेश काढण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, १८६० (४५)च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.