जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार

0

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 1 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13.3.2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवणेबाबत आदेशित करण्यात आले होते.

शासनाने 14 एप्रिल, 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (Lockdown) लागु करण्यात आली असुन सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत आणि कोवीड-19 कोरोना या आजाराचे संक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना दिलेल्या आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन साथरोग प्रतिबंधक कायदा 1987 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी दिनांक 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांच्यावर आपती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल यांची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.