जिल्ह्यातील सर्व शाळाही सोमवारपासून बंद राहणार

0

जळगाव – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळाही दि. ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोना रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील शिक्षण विभागाला मात्र अद्याप आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.