भुसावळ- जिल्ह्यातील सात नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या असून त्याबाबतचे आदेश सोमवार, 11 रोजी सायंकाळी शासनाचे उपसचिव कि.पां.वडते यांनी काढले. आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
चोपडा निवडणूक नायब तहसीलदार स्वप्नील यशवंत सोनवणे यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात (गृह शाखेत) बदली झाली तर भुसावळचे पुरवठा तपासणी अधिकारी आर.एल.राठोड यांची त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात बदली करण्यात आली. भुसावळचे नायब तहसीलदार संजय तायडे यांची रावेर निवासी तहसीलदारपदी तर मुक्ताईनगरचे निलेश पाटील यांची श्रीगोंदा उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदारपदी बदली करण्यात आली. यावलच्या निवडणूक नायब तहसीलदार डॉ.योगिता नारायण ढोले यांची श्रीगोंदा महसूल नायब तहसीलदारपदी तर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार कक्षातील अभिजीत सुखदेव वांढेकर यांची संगमनेर तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार म्हणून तसेच जामनेर महसूलचे नायब तहसीलदार परमेश्वर अं.कासुळे यांची नाशिक तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी बदली करण्यात आली.