जिल्ह्यातील हज यात्रिंना रिजर्व्ह कोटा द्या

0

धुळे । जिल्ह्यासह राज्यातील हज यात्रेकरुंच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात तसेच गेल्या चार ते पाच वर्षापासून सातत्याने यात्रेला जाण्यासाठी निवेदन करणार्‍या हज यात्रिसाठी रिजर्व्ह कोटा दिला जावा, अशी मागणी धुळे जिल्हा हज यात्री अ‍ॅक्शन कमेटीच्यावतीने संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. कमेटीचे जिल्हा अध्यक्ष गोपाल अन्सारी, उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन राजाभय्या, शेख जाविद मल्टी, शेख वशी सरदार, शाहीद शाह, अफसर पठाण, वशीम बारी, महमंद फैसल, अशफार शेख आदी यावेळी उपस्थित होते.

800 ते 1100 अर्ज प्रलंबित
या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी हज यात्रासंबंधी नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केले गेले. हज यात्रेंकरुसाठी राखीव कोटा मंजुर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे अल्पसंख्यांक समाजात असंतोष व्यक्त होत आहे. तथापी हज यात्रेकरुंना विशेषता जे चार ते पाच वर्षापासून सातत्याने यात्रेसाठी आवेदन करीत आहेत त्यांच्यासाठी रिजर्व्ह कोटा देण्यात यावा. 70 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या हज यात्रेकरुंसोबत एक मतदगार यात्रीला जाण्याची परवानगी दिली जावी. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरु आई बाप असतील तर त्यांच्या सोबत मुलगा-सुन किंवा मुलगा, मुलगी असे दोन जण मदतगार म्हणून जाण्याची परवानगी मिळावी. धुळे जिल्ह्यातून हज यात्रेसाठी 800 ते 1100 अर्जदार यात्रेकरु चार पाच वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याचा अग्रक्रमाने विचार करावा अशी मागणी या निवेदनातून केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.