जळगाव: कोरोना बाधित क्षेत्रात नागरिकांचा वावर बंद करण्यासाठी जिल्ह्यातील १५ ठिकाणे प्रतिबंधीत (कंटेटमेंट झोन) क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान यात जळगाव शहरातील दोन परिसरांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधित परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यात अमळनेर शहरातील ४, भुसावळ ५, पाचोरा ३, अडावद १ आणि जळगाव शहरातील मारोतीपेठ व समतानगर असे एकूण १५ परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या परिसरात संपूर्ण लॉकडाउन राहणार आहे. शिवाय नागरिकांच्या बाहेर पडण्यावरहि निर्बंध घालण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.