दिलासा: जिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

0

आज नव्याने सहा संशयित रूग्ण दाखल

जळगाव- येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत ७७ संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा देणारी बाब आहे.
जळगाव शहरात कोरोना या विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १९२० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १८९ रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ७७ संशयित रुग्ण दाखल झाले होते त्यापैकी ६७ जणांचे तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासणीचे ७ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर दोन रुग्णांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.