जळगाव मतदार संघासाठी विष्णू भंगाळे,सुनिल महाजन यांच्यासह 35 जणांनी घेतले अर्ज
जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रियाआजपासून सुरु झाली.जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 198 नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.जळगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी शिवसेनेचे विष्णू भंगाळे,सुनिल महाजन यांच्यासह 35 जणांनी 67 अर्ज घेतले.
विधानसभा निवडणुकीच्या जळगाव विधानसभा मतदार संघाच्या इच्छूक उमेदवारांना अर्ज घेण्यासाठी आणि अर्ज स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी दि.4 आक्टोबर अंतिम मुदत आहे. आज पहिल्या दिवशी 35 जणांनी 67 अर्ज घेतले आहे. यात विष्णू भंगाळे, संगीता भंगाळे,सुनिल महाजन,गौतम सुरवाडे,गोविंद तिवारी,नारायण अग्रवाल,युवराज सोनवणे,अनिल वाघ,वंदना पाटील,दिलीप अहिरे,जयेश पाटील, प्रवीण गुरव,शैलेंद्र पाटील,परवेज पठाण,सुरेंद्र कोल्हे,गणेश ढेंगे,मो.उजेफ फारुख,जहॉगीर पठीण, अशोक महाजन,सुभाष ठाकरे,ललित शर्मा,नामदेव कोळी,अर्जून भारुडे,गोकुळ चव्हाण,विष्णू घोडेस्वार,दीपक जाधव,आशिष जाधव,शिवराम पाटील,डॉ.शांताराम सोनवणे,जमील देशपांडे,अशोक शिंपी,विवेक ठाकरे,अशफाक पिंजारी,शरिफ बागवाण यांचा समावेश आहे.
अमळनेरमध्ये पहिल्या दिवशी केवळ दोन अर्ज
विधानसभा निवडणूकीसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 11 विधानसभा क्षेत्र असून यामध्ये आज पहिल्याच दिवशी सर्वाधिक 67 नामनिर्देशनपत्र जळगाव शहर मतदार संघात तर सर्वाधिक कमी 2 अंमळनेर मतदार संघात वितरीत झाले आहे. चोपडा-21, रावेर-13, भुसावळ-24, जळगाव शहर-67, जळगाव ग्रामीण-27, अमळनेर-2, एरंडोल-7, चाळीसगाव-18, पाचोरा-6, जामनेर-8, मुक्ताईनगर-5 असे एकूण 198 नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
नाहरकत प्रमाणपत्रासाठी धावपळ
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे. दि.27 ते 4 आक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.त्यामुळे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी ईच्छूकांची धावपळ सुरु झाली आहे.शुक्रवारी नाहरकत प्रमाणपत्रासाठी विशाल शर्मा, काळू कोळी, तुळशीराम पाटील, जहांगीर मुनाफ पटेल, अॅड. गोविंद तिवारी, परवेज खान सरदार खान, , चिमणराव पाटील, अस्मिता पाटील, गणेश बुधो सोनवणे, सुनील महाजन, अंजली रत्नाकर बावीस्कर, डॉ. शांताराम सोनवणे, नरेश बळीराम सोनवणे, डॉ. सुरेशसिंह सुर्यवंशी, अरूण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, जितेंद्र बाबुराव देशमुख, पल्लवी जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या प्रतिभा अशोक शिरसाठ, शैलेंद्र शिवाजी पाटील, जितू मुंदडा यांनी अर्ज दाखल केला आहे.