जळगाव । देशातील सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड सक्तीचा करण्यात आलेला असल्याने सर्वांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्ड शिवाय कोणतेही शासकीय कामकाज होत नसल्याने लहानांपासुन मोठ्यापर्यत सवार्ंनाच आधारकार्ड आवश्यक आहे. शाळकरी मुलांना देखील आधारकार्ड आवश्यक असून अद्यापही जिल्ह्यातील 31 हजार विद्यार्थी आधार नोंदणी पासुन वंचीत आहे. विद्यार्थ्याच्या आधार नोंदणी संबंधी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाच्या अधिकार्यांच बैठक घेतली. बैठकीत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी जिल्ह्यातील तालुका निहाय आधार नोंदणीची स्थिती जाणुन घेतली. अद्यापही शंभर टक्के आधार नोंदणी होवू शकलेली नाही. विद्यार्थ्याच्या आधार नोंदणीसाठी शिक्षण विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असुन आधार नोंदणीच्या सख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. जवळपास 95 टक्के विद्यार्थ्याची आधार नोंदणी पुर्ण झाली आहे. या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
सीईओ घेणार झेडपीतील खर्चाचा आढावा
जळगाव । जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेसाठी मंजुर करण्यात आलेला निधी आणि जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजनातील निधीचा खर्चाचा आढावा जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय हे शुक्रवारी 18 फेबु्रवारी रोजी घेणार आहे. जिल्हा परिषदेचा मागील वर्ष 2016-17 चा सुधारीत अंदाज पत्रकातील झालेला खर्च आणि 2017-18 या वर्षीचा मुळ आर्थिक नियोजनातील खर्च याचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. वर्ष 2017-18 साठी नियोजीत करण्यात आलेल्या रकमेविषयी यावेळी माहिती दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहे.