जळगाव । विज्ञानाची जिल्हापरिषदेच्या ऑनलाईन बदलीप्रक्रियेत शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ झाल्यानंतर बर्याच शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे शिक्षकांच्या नव्याने पदस्थापना करण्यात आल्या असुन 432 विस्थापितांपैकी 395 विस्थापीत शिक्षकांच्या आज रोजी शासनाने बदल्यांचे आदेश पारीत केले आहे. यातुन उरलेल्या 37 शिक्षकांच्या बदल्या रॅडम पद्धतीने फेरीनुसार होणार असल्याचे आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. विस्थापीत शिक्षकांपैकी काही शिक्षकांच्या बदल्या अन्यायकाराक झाल्याचे शिक्षक संघटनांद्वारे एनआयसीकडे तक्रारी केल्या होत्या व काहींनी तरी न्यायालयात दाद मागितली होती. पण शासनाने याबाबत 12 जून रोजी 432 पैकी 395 जणांच्या बदलींचे आदेश पारीत केल्यानंतर त्यांना पदस्थापना दिल्या. यामुळे शैक्षणिक सत्र सुरु होण्या आगोदर बदल्यांच्या सावळा गोंधळावरती पर्दा पडल्याची चिन्हे दिसत आहेत.
387 पैकी 355 उपशिक्षकांना पदस्थापना
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांमध्ये 387 उपशिक्षकांचा सामावेश असुन त्यापैकी 355 शिक्षकांना पदस्थापना दिल्या आहेत. पदवीधर शिक्षकांमध्ये 45 शिक्षकांपैकी 40 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आहेत.
19 रोजी न्यायालयात सुनावणी
बदली प्रक्रीयेत विस्थापीत झालेल्या व अन्याय झालेल्या शिक्षकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याअनुशंगाने याबाबत आज सुनावणी झाली. शिक्षण विभागाने बदल्यांबाबत न्यायालयात माहीती सादर केली. तसेच विस्थापीतांना पदस्थापना देण्यात आल्या असल्याचे कागदपत्र देखील सादर करण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी 19 रोजी होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.
नविन शाळेत हजर होण्याचा सुचना
पाचव्या फेरीत ज्या बदलीपात्र विस्थापीत शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन फॉर्म भरले होते.त्यांच्या बदलीचे आदेश आज शासनाने पारीत करून त्यांना नवीन शाळेवर हजर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच विशेष संवर्ग 1, 2, 3, 4 मधील ज्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश मिळुन हि बदली झालेल्या शाळेत हजर झाले नसल्यास त्यांच्यावर सीईओंनी कारवाई करावी असे अप्पर सचिव प्रि.शं.काबळे यांनी आदेशात म्हटले आहे.