जळगाव । जिल्ह्यातीलअनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील आठ गावांना टँकरचा आधार देण्यात आला असून, येत्या दोन दिवसांमध्ये जळगाव तालुक्यातील एका गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेने या वर्षासाठी एकूण 443 गावांमधील संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला असून, त्यासाठी कोटी 35 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर ते जून या काळासाठी तीन टप्प्यांत पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 443 गावांसाठी 579 योजनांचे नियोजन करण्यात आले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर -2016 या काळात 63 गावांमध्ये टंचाईचा अंदाज होता. त्यासाठी 66 योजनांसाठी कोटी 92 लाखांची तरतूद करण्यात आली होती; परंतु गतवर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात टंचाईच्या झळा बसल्या नाहीत. जानेवारी ते मार्च-2017 या काळासाठी 178 गावांमध्ये टंचाईची शक्यता गृहीत धरून 225 योजनांसाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, मार्च महिन्यात आठ गावांमध्ये टँकर आणि 12 गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तिसर्या टप्प्याला एप्रिलमध्ये प्रारंभ होणार असून, त्यात सर्वाधिक 202 गावांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. या गावांसाठी 288 योजनांची तयारी केली आहे.